या देशातील वर्षोनुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात आवाज बुलंद करणारे, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करणारे, मानवता हीच ईश्वर सेवा मानणारे, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला क्रांतिकारी दिशा देणारे, देव दगडात नसून, माणसात असल्याचे सांगून परिवर्तन घडवून आणणारे गाडगे बाबा यांची आज जयंती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचा ऋणानुबंध होता. हे दोन्ही महामानव आपल्या कामातून समाज परिवर्तन करत होते.
गाडगे महाराज यांच्या कार्याला, विचाराला जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन💐