HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

@historybymundesir


UPSC/MPSC/ SET/NET/PET/PSI/STI/ASO गट ब व क (Pre+Main) व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे 🎯🎯 GS Notes and इतिहास विषयाच्या नोट्स
📝 दर्जेदार Pdf नोट्स.
🌹 (मार्गदर्शक:- Professor Ravi Munde Sir.) 🌹
🏆 (M.A. History & English,B.ed) 🏆

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

21 Jan, 00:22


RAVI MUNDE-1.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

21 Jan, 00:16


इतिहास - सराव पेपर.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

21 Jan, 00:15


HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR:
🌹 APJ Abdul Kalam  🌹

पूर्ण नाव :- अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम

🌹 जन्म :- १५ ऑक्टोबर १९३१
रामेश्वरम, तामिळनाडू.
📋 वाचन प्रेरणा दिन

💐 मृत्यू :- २७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँग, मेघालय.

📝 अवुल पाकीर जैनुलाब्दीन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम  हे  भारताचे माजी राष्ट्रपती तसेच एक अभियंता तसेच  एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते.

🚀 प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.
🛸 भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.

🎯 त्यांना "पीपल्स प्रेसिडेंट" (जनतेचे राष्ट्रपती) म्हणून व्यापकपणे संबोधले जाते

📝 राष्ट्रपतीपदानंतर कलाम हे शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले.

🗞भारतरत्नसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते

📒 शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४).

🏢 नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).

🔭 १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.

🔮१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.

🚀 १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.

🎯 १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
✈️ १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक

🛰 १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
🎖१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त

🥏 १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
🌍 १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती.

🏤 रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
🛰 १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
🛰 १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.

🥏 १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री
व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) हा रणगाडा व लाइट कॉंबॅट एरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

📜 १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
🗞 २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
🧿 २००१ : सेवेतून निवृत्त.
🔮 २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

👨‍👧‍👧 ते विद्यार्थ्यांना सांगेल की पाच वाक्य नेहमी स्वतःशी बोलत रहा –

1⃣  मी सर्वात बेस्ट आहे.
2⃣ मी हे काम करू शकतो.
3⃣  चॅम्पियन होतो आणि आहे.
4⃣ देव नेहमी माझ्या सोबत आहे.
5⃣ आजचा दिवस माझा आहे.

📝 ग्रंथ संपदा  :-१) अदम्य जिद्द,२) इग्नाईटेड माईंड : अनशिलिंग पावर विदिन इन इंडिया,३) इंडिया २०२० : व्हिजन फाँर द न्यु मिलनियम ,४) इंडिया माय ड्रीम
५) इन व्हिजन अँण्ड इम पाँवर्ड नेशन फाँर सोसायटल ट्रान्सफाँरमेशन,६) विंग्ज आँफ फायर,७) टर्निंग पाँईंट,८) दिपस्तंभ


💐 27 जुलै 2015 रोजी शिलॉंग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये लेक्चर देण्यासाठी ते गेले असताना त्यांना काही अस्वस्थ वाटू लागलं थोडी विश्रांती घेतल्यावर त्यांना थोडा बरही वाटलं त्यांनी लेक्चर द्यायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात ते स्टेजवरच कोसळले कलाम यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं पण संध्याकाळी सात वाजून 45 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा निधन झालं.

कलाम साहेब आज आपल्यात नाहीत पण ते आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे काही करून गेलेत त्यासाठी आपल्या देशाच्या पुढच्या अनेक पिढ्या त्यांच्या ऋणी राहतील सर्वांच्या लाडक्या असलेल्या या भारतरत्नाला अखंड भारताचा सलाम.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो..

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

21 Jan, 00:07


नाना जगनाथ शंकरशेठ- New Notes

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

21 Jan, 00:07


थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

📜● आधुनिक मनू : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

📝● दलितांचा मुक्तीदाता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔮● कर्मवीर : भाऊराव पायगोंडा पाटील

🪴● आधुनिक भगीरथ : भाऊराव पायगोंडा पाटील

🌍● महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन : भाऊराव पायगोंडा पाटील

🏵● महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे

🌷● राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज

🌾● हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख

🪐● महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक : लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख

🚑● धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड

📒● राजर्षी : शाहू महाराज

🏢● वस्तीगृहाचे आद्यजनक : शाहू महाराज

🗼● सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष : शाहू महाराज

⛲️● असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक

🎡● जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक

📃● मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

📑● आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर

📈● निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

📉● मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

● क्रांतीसिंह : नाना पाटील

🗡● सेनापती : पांडुरंग महादेव बापट

🛡● सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी

🧿● मराठी भाषेतील पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर

🏺● महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक : दादोबा पांडुरंग तर्खडकर

🖌● महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग : महात्मा ज्योतीबा फुले
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

5,314

subscribers

731

photos

25

videos