एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा)

@eknathpatiltatya


Free PDF, Current affair, letures

एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा)

22 Oct, 02:49


💐 गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार :-

🔸पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
🔸याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
🔸मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
🔸निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
🔸ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
🔸मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
🔸तिला गोवा राज्य युवा पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा)

19 Oct, 15:33


🔷राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा

🔸भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
🔸राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
🔸त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
🔸त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले आहेत.
🔸जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.


राष्ट्रीय महिला आयोग :
🔸भारत सरकारची वैधानिक संस्था
🔸1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार
🔸राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा)

14 Oct, 10:04


अर्थशास्त्रातील मधील नोबेल विजेते 2024

◾️डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका)
◾️सायमन जॉन्सन (अमेरिका)
◾️ जेम्स ए. रॉबिन्सन (अमेरिका)

यांना 2024 चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा)

09 Oct, 14:11


गट क परीक्षा २०२४

14,724

subscribers

307

photos

25

videos