🛑 सरकारीया आयोग🛑
🔹राज्यपालांच्या नियुक्तीसंदर्भातील शिफारशी
1)राज्यपाल नेमण्याच्या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याशी सल्लामसलत करण्याची पद्धत असावी.
2)राज्यपालांच्या नेमणुकीत राज्य सरकारांचा सहभाग असणे आवश्यक असून, समित्या स्थापन करण्यात आल्या पाहिजेत.
3)राज्यपालांना त्यांच्या कार्यकाळाची पाच वर्षे पूर्ण करण्याची मुभा देण्यात यावी.
4)ती व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती असणे आवश्यक आहे.राज्यपालपदी नियुक्त झालेली व्यक्ती नियुक्तीच्या राज्याबाहेरील असावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
5)कधीही सक्रीय किंवा स्थानिक राजकारणात सहभागी न झालेली व्यक्ती राज्यपालपदासाठी पात्र ठरेल.
6)राज्यपाल हे पद सोडल्यानंतर त्यांना सरकारच्या अखत्यारीतील इतर कोणत्याही नियुक्तीसाठी किंवा लाभाच्या पदासाठी पात्र मानले जाणार नाही.
7)निवृत्तीनंतरचे लाभ राज्यपालपद भूषविलेल्या व्यक्तीला मिळावेत.