तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈 @timiratunitejakade20 Channel on Telegram

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

@timiratunitejakade20


मित्र-मैत्रिणींनो बोलते व्हा...आपल्याही भावना आमच्यापर्यंत पोहचवत जा.....

........तुमच्याकडे असणारी पुस्तके, व आपल्याला सुचलेली वाक्ये,विचार,कविता,चारोळ्या आम्हाला पाठवत जा ........

@timiratunitejakade4141

- अ.ल.खाडे ( कर सहायक)

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈 (Marathi)

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈 या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर मित्र-मैत्रिणींनो बोलते व्हा आणि आपल्याही भावना तीर येतील. येथे आपण असणारी पुस्तके, सुचलेली वाक्ये, विचार, कविता, चारोळ्या सामिल करू शकता. आपल्याला जर कधीही विचारायचं असेल तर या चॅनलवर आपला स्थान आहे. चांगल्या पुस्तकांचं सामग्री वाचून आपल्या ज्ञानात वृद्धी करा. आपल्याला उत्कृष्ट कविता वाचायला मिळतील. ह्या चॅनलवर जाणाऱ्या सर्व कार्यात आपले प्रत्यक्ष सहभाग पाहिजे. चॅनलवर सदर स्वागत आहे! - अ.ल.खाडे (कर सहायक)

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

14 Nov, 16:43


आयुभरासाठी माझी प्रिय,राणी, एक मैत्रीण म्हणून साथ मला देशील ना।।जीवनरुपी प्रवासाच्या प्रत्येक वळणावर येऊन मला भेटशील ना।।माझ्या संकटाच्या रात्री मनाला आधार देणारा संवाद तू माझ्याशी साधणशील ना।।मला माहिती आहे ग,या जन्मात आपण एक नाही होऊ शकतं पण मात्र पुढील जन्मात माझी जीवनसाथी बनून येशील का?!,,,✍🏻

. . .I like you.. Dk. . .♥️🦋
चित्र रेखाटन शेवाळे दीप्ती. गोपाळ

एकमन#लेखक

 
@Ommshelke

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

14 Nov, 16:42


भारतीयांचा परदेशी शिक्षण,व्यसायाकडे कल वाढतोय का??(स्वदेशासाठी🇮🇳फक्त पूर्ण वाचू नका त्यावर विचार करा,तेव्हा खरा सार्थ समजेल,सर्व बाजू विचारात घेवून स्वमत मांडले आहे)

एकेकाळी आपल्या देशास सोने की चिडिया असणारा देश संबोधतले जायचे कारण ह्या पवित्र देशात सर्व गोष्टींची भरभराट होती मग ती शिक्षणाची असो की व्यवसायाची.आपलं प्राचीन ज्ञान मानवी जीवनासाठी किती उपयोगाचे आहे हे फक्त चार वेदांचा अभ्यास केला तरीही समजते.आर्यभट्ट,चाणक्य,स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारखे थोर अभ्यासक येथे होऊन गेले आणि त्यांनीच भारतीय ज्ञानाचा पाया ह्या मातीत पेरला व त्या विचारातूनच देशात आमूलाग्र बदल,चळवळी घडल्या.नालंदा,तक्षशिला ही प्रसिद्ध विद्यापीठे होती,जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत अशी ही अभिमानास्पद शिक्षणपद्धती पुढे चालत राहिली.
   परंतु आताची परिस्थिती आणि लोकमत सांगण्यास दुःख होते की,बहुतांश भारतीय लोक/विद्यार्थी ह्यांना विदेशी शिक्षण/व्यवसाय सोयीस्कर वाटतोय कारण विदेशात अनेक संधी,कमी पैशात शिक्षण,रोजगार मिळेल असा त्यांचा समज असतो.आपण विदेशात जाऊन शिक्षण घेतो इथपर्यंत ठीक आहे परंतु स्वभुमित येऊन त्याच शिक्षणाच्या उपयोग येथील समाजासाठी करतो का?ह्यांचे उत्तर बहुतांश नाही असे असेल अपवादही असतील काही परंतु जेव्हा शिक्षणासाठी,व्यवसायासाठी विदेशात जातो तेव्हा विदेशी लोक,कंपन्या आपल्याला अश्या ऑफर्स दाखवतात की  तिथलेच कायमस्वरुपी रहिवाशी होते आणि एक स्वदेशी माणूस आपले कष्ट,बुध्दिमत्ता विदेशाच्या प्रगतीसाठी फक्त काही पैशाच्या मोबदल्यासाठी गहाण ठेवतो.पैसे भेटतात परंतु प्रगती विदेशची होते.ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण सुंदर अश्या भारतराष्ट्रास,इथील परिवरास विसरतो.
  हेच सगळे व्यवसायिक स्वदेशात जे विदेशात काम करणार आहोत तेच केलं तर देशाची किती प्रगती होईल आणि ज्या काही अडचणी असतील त्या एकमेकांमध्ये सोडवल्या जातील,परंतु त्यासाठी स्वदेशात एकत्र काम करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे त्याशिवाय राष्ट्रउन्नत्ती होणे कठीण आहे.ज्या राष्ट्राने,स्वराज्याच्या कुशीत वाढलो इथिल अन्न खाऊन मोठे झालो,मग ह्या देशात काम करायला कसली लाज?व्यवसायाच्या संधी कदाचित नसतील तर आपण त्याचे क्षेत्र आणि ठिकाण बदलू शकतो. कदाचित थोडे पैसे कमी मिळतील परंतु समाधान तर नक्की मिळू शकते ना.इतर देशातलं वातावरण , संस्कृती,भोजन आणि हवमान आपल्याला पचल का आणि मूळ प्रश्न येतो सुरक्षेचा आणि युक्रेनरशिया युध्याच्या काळात कितीतरी लोक स्वदेशात परतले हे तर जगाने पाहिलच आहे.शिक्षण विदेशात झाल परंतु त्याचा उपयोग स्वदेशत होवा.विदेशी शिक्षण,नोकरी विरोध नाही परंतु प्रत्येक गोष्टीस नाण्याप्रमाने असणाऱ्या दोन्हीही बाजू पडताळणे गरजेचे आहे,शेवटी निर्णय हा व्यक्तिकच असतो......🦋🌺🙏.....शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

06 Nov, 12:01


(वेळ काढून पूर्ण वाचा,विराट प्रेरणादायक संघर्षगाथा मांडली आहे)
आज यशाच्या उंच शिखरावर पोहचलेले अनेक व्यक्ती दिसतात.आजच success जगाला दिसतो,परंतु कालचा संघर्ष कुणाला दिसत नाही😔.हे जगाचा नियमच आहे जग तुमच फक्त output पाहत असतं,त्यासाठी तुम्ही सोसलेल्या वेदना,यातना नाहीत😒.यशस्वी होण्याचा प्रवास हा काट्यानिंच भरलेला असतो मग तो प्रवास अंबानींचा असो की विराटचा  जोपर्यंत संघर्षाच्या त्या वेदना आपल्याला जाणवत नाहीत तोपर्यंत स्वतःवर असणारा विश्वास आणि आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा अंदाजही येत नाही👍म्हणून कोणतेही परस्थिती असो,आपल्याला चुकीचं समजणारी,टीका करणारी,टोमणे मारणाऱ्या व्यक्ती ह्याकडे जास्त लक्ष दिले नाही तरच कुठे काहितरी मिळेल.
  विराट कोहलीचाही संघर्ष हाही अतिशय कसोटीचा.वाईट दिवस पहिल्याशिवाय चांग्याल्या दिवसांची किंमत समजत नसते.अनुभव हाच मोठा गुरू आहे,आणि त्यातूनच शिकत विराट न डगमगता पुढे गेला म्हणूनच आजही विराटचे वेगवेगळे रेकॉर्डस् बनतात.2006 साली फक्त 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने खेळ सोडला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याने शतकी धावा केल्या.त्याच्या हे देश,संघाप्रती असलेल्या समर्पणाने त्याचे किती मजबूत व्यक्तिमत्व आहे,हे दाखवले.स्वतचं फिटनेस जपण्यासाठी तो आजही आवडीचे पदार्थ खाणे टाळतो ह्यावरून त्याचा त्याग दिसतो. क्रिकेटच्या क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.प्रत्येक वेदनादायक प्रवासाचा सुखदायक शेवट होतोच आणि त्याचे उदाहरण म्हणजे 👑 किंग कोहली..
.........🦋🌺🙏.........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

06 Nov, 12:01


आपल्या डोळ्यातील अश्रू प्रत्येकाला दिसतात हे मात्र खरं तर ते मनातील साठलेलं दुःखं शांतपणे बाहेर काढण्याचा एक मार्ग असतो ते ओळखणं सर्वांना जमतं नसतं म्हणून तर मनातीळ वेदना कमी करण्यासाठी कधी कधी एकांत हवा असतो कारण त्यांना समजून घ्यायला कोणीच तयार नसतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

05 Nov, 11:06


आयुष्य आनंदात कस जगायचं? याच उत्तर देताना बुद्ध म्हणतात...
✒️" भय,भीती यापासून मुक्त व्हा..
उद्या माझं काय होईल?याची चिंता ज्याने सोडली तो सुखी झाला..
तुमचा आजचा दिवस, आजचा प्रत्येक क्षण आनंदात कसा जगता येईल?याचा विचार करा...
तुमचा आजचा दिवस सुंदर असेल तर,नक्की तुमच भविष्य सुंदर असेल.. कारण जसे तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनत जाता.. जर तुम्ही चांगले विचार केले तर तुम्ही नक्की चांगले बनाल आणि जर वाईट विचार केला तर तुम्ही वाईट बनाल..
म्हणून अत्त! दीप!!भव!!!स्वयंप्रकाशित व्हा स्वतः च स्वतः चा दिवा बना..!".
- भगवान गौतम बुद्ध..

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

26 Sep, 12:04


*मोबाईल वर अभ्यास होतो का? हा माझा महत्वपूर्ण लेख आज या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला नक्की वाचा...*

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

22 Sep, 16:16


जीवन एक सुखकर प्रवास आहे त्यात कधी दुःखाचे घाट तर कधी सुखांची वाट थोड्या थोड्या अंतराने येत राहतं फक्त या रस्त्यात आपल्या संयम सुटुद्यायचा नसते लोकं काय नावं ठेवणारच आपण आपलं ध्येय उत्तम प्रकारे साध्य करायचं असतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

22 Sep, 16:15


मराठी साहित्य क्षेत्रातील आज अत्यंत ख्यातनाम लेखकांची स्नेही भेट झाली. माझ भाग्य की खूप कमी वयात मला अशा सर्व थोर व्यक्तींचा सहवास लाभला.
मा.प्रा.बाबा भांड सर, मा.प्रा.फ.मु. शिंदे सर, मा.प्रा.नीरजा मॅडम... ( सर्व ख्यातनाम लेखक तसेच पाठ्यपुस्तकातील लेखक आहेत )
कुठूनतरी सुरु केलेला प्रवास आज कुठंतरी पोहोचतोय यात समाधान आहे. कित्येकदा हा प्रवास थांबवू म्हटलं पण ही कला काही शांत बसू देत नाही. ती नेहमी अस्वस्थ करत राहते. म्हणून अधून मधून ह्या रेघोट्या तुमच्या भेटीस आणत असतो. काही साध्य केलं आहे अजून बरंच काही बाकी आहे तोपर्यंत...
चालत राहू, सत्याच्या बाजूने... 🙏

आणि आयुष्याला सांगत राहू. अजुन गा रे, अजुन गा रे.... अजून काही...

मराठी समीक्षेचे वर्तमान प्राचार्य माननीय प्रभाकर बागले सर यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत केला होता.

🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

22 Sep, 03:53



तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

22 Sep, 03:05


📔शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक *कर्मवीर भाऊराव पाटील* (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

19 Sep, 15:04


आमचे सहकारी मित्र श्री. सूरज चाकणे सर यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

10 Sep, 16:34


काही कारणास्तव आमच्या अंकाचे थांबलेले प्रकाशन आज SP सरांच्या हस्ते संपन्न झाले. 😊
    ( या सर्व प्रवासात आपल्यासारख्या प्रतिभावंत रसिकांनी मला मोलाची साथ दिली याबद्दल आपले कृतज्ञपूर्वक आभार ) 🙏

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक मा. सुनिल लांजेवार सर ( SP ), ग्रामीण भरोसा सेल प्रभारी अधिकारी मा. आरती जाधव मॅडम ( API ), पोलीस कॉन्स्टेबल मा. बाबासाहेब थोरात सर उपस्थित होते.
शून्यातून आहे हो माझ सर्व... ❤️

    ना बाप पाठीशी, ना माझी माय शिकलेली
स्वबळावर लढलो आणि जिंकलो सुध्दा

ना पाठीवर थाप कोणाची,
ना माझे घराणे गाजलेले
माझियापासून सुरु होतो
इतिहास माझा... 🙏

- संघर्षाची धाय उकळून पिली मी. कोण अडवेल अशा तुफानाला ज्याच्या रक्तातच संघर्षाच्या मशाली पेटतात.
आता माझा वैयक्तीक पुढचा प्रवास मला माहीत नाही. पण एका अविरत संघर्षाला न्याय देता - देता इथपर्यंत येण्यासाठी फार कष्टाची झळ सोसावी लागली. जन्माला येऊन आपल्यासारखे दोन प्रेमळ माणसं माझ्या स्वभावावर आणि चांगुलपणाने कमावता आले याचा अभिमान नक्कीच वाटतो.
   शेवटी चालत राहीन, सत्याच्या बाजूने ✌️

🍁 प्रकाशाच्या वाटा  🍁

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

03 Sep, 09:37



तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

27 Aug, 09:22


Follow the

🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁

channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029VaiJ05JGJP8AsvBjVT35...

समाजहितैशी/युवा साहित्यिक - चंद्रकांत तायडे पाटील

आपला सलोखा जपण्यासाठी जॉईन राहा. आणि आयुष्याचा वेध घेऊ इच्छिणाऱ्या रसिकांनाही पाठवा

3,070

subscribers

6,404

photos

399

videos