Последние посты ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) в Telegram

Посты канала ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
11,504 подписчиков
7,564 фото
135 видео
Последнее обновление 25.02.2025 20:44

Последний контент, опубликованный в ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ на Telegram


📌 पालकमंत्री यादी 2025.pdf

✈️ @MPSC_vision

🛥 INS सुरत
🛳 INS निलगिरी
INS वाघशीर

आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत मुंबईतील
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे बांधले गेले आहे.

♦️👉तलाठी; आकडेवारी

👉मंजूर:- 16,549
👉सरळसेवा/ पदोन्नती‌:- 14,078
👉रिक्त:- 2477


✈️ @MPSC_vision

🚨कंबाईन ग्रुप  B पूर्व परीक्षा 2 Feb साठी उर्वरित दिवसांसाठी रणनीती 🎯


आपल्याकडे 15 दिवस शिल्लक आहेत,प्रत्येक दिवसांचे योग्य ते नियोजन करायला पाहिजे.

आयोगाच्या 2017 ते 2023 पर्यंत च्या कंबाईन ग्रुप B&C पूर्व च्या सर्व प्रश्नपत्रिका वेळ लावून पुन्हा एकदा सोडवून घ्याव्यात.

प्रत्येक पेपर सोडवून झाल्यावर स्वतः बारकाईने विश्लेषण करावे आणि आपण काय चुका केल्यात हे लक्ष्यात आल्यावर ती चूक पुढील पेपर मध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी.

इथून पुढे प्रत्येक दिवशी आपल्या टेबल वर आयोगाचे पेपर असावेत म्हणजे त्याद्वारे आपण आयोगच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करू शकू.

आठवड्यातून किमान 3 टेस्ट सिरीज चे पेपर सोडवून Time Management केल पाहिजे आणि silly Mistakes कमी केल्या पाहिजेत.

चालू घडामोडी साठी 3 ते 4 जणांचा ग्रुप बनवून दररोज किमान 2 तास discussion मधून year book किंवा परिक्रमा ची fast revision केली पाहिजे.

गणित आणि बुद्धिमत्ता साठी आयोगाचे 2017 ते 2023 पर्यंत चे कंबाईन पूर्व तसेच मुख्यचे चे सर्व PYQ वारंवार सोडवले पाहिजेत.

टेस्ट पेपर सोडवता अजिबात भीती बाळगू नये आणि किती मार्क्स येतील याचा विचार करू नये.

पाठांतराच्या गोष्टी जसे की भूगोल आणि राज्यशास्त्र असेल ते ग्रुप मध्ये बसून ज्या काही ट्रिक्स असतील त्याची राहिलेल्या दिवसात चांगली revision करावी.

आपण जे books वापरत असू त्यामधील Highlights केलेले मुद्दे आणि नोट्स इथून पुढे प्राथमिकतेने वारंवार वाचले पाहिजेत.

आतापासून जास्तीत जास्त वेळ दिल्यास आपण जास्तीत जास्त revision करू शकू.

राहिलेले दिवस आत्मविश्वास द्विगुणित करून पूर्ण जोशाने योग्य ती तयारी आणि प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

येणाऱ्या 20 दिवसात social media पासून आणि जागावाढ च्या चर्चेपासून दूर राहावे.

अगदी शेवटी जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर logic आणि elimination method वर काम करायला चालू करावे.

आतापर्यंत आपला खूप अभ्यास झाला आहे आणि नक्कीच यश मिळणार आहे या सकारात्मक विचाराने focus ने अभ्यास करावा.

🙇‍♂️शांत डोकं ठेऊन सर्व ताकतीने परीक्षेला सामोरे जाऊ 🎯🎯
🥇PSI अमोल घुटूकडे...
    (राज्यात प्रथम 2022)


✈️ @MPSC_vision

🔖महाराष्ट्र : प्रमुख नद्या व त्यावरील धरणे:

1. धरण: राधानगरी
- नदी: भोगावती
- जिल्हा: कोल्हापूर

2. धरण: कोयना (हेळवाक)
- नदी: कोयना
- जिल्हा: सातारा

3. धरण: वालदेवी
- नदी: वालदेवी
- जिल्हा: नाशिक

4. धरण: अरुणावती
- नदी: अरुणावती
- जिल्हा: यवतमाळ

5. धरण: इसापूर
- नदी: पेनगंगा
- जिल्हा: हिंगोली-यवतमाळ

6. धरण: वीर धरण
- नदी: नीरा
- जिल्हा: पुणे

7. धरण: भंडारदरा (विल्सन)
- नदी: प्रवरा
- जिल्हा: अहमदनगर

8. धरण: गंगापूर
- नदी: गोदावरी
- जिल्हा: नाशिक

9. धरण: जायकवाडी
- नदी: गोदावरी
- जिल्हा: छ. संभाजीनगर

10. धरण: भाटघर (लॉइड धरण)
- नदी: नीरा
- जिल्हा: पुणे

11. धरण: माजलगाव
- नदी: सिंधफणा
- जिल्हा: बीड

12. धरण: मोडकसागर
- नदी: वैतरणा
- जिल्हा: ठाणे

13. धरण: धोम
- नदी: कृष्णा
- जिल्हा: सातारा

14. धरण: दारणा
- नदी: दारणा
- जिल्हा: नाशिक

15. धरण: बिंदुसरा
- नदी: बिंदुसरा
- जिल्हा: बीड

16. धरण: सिद्धेश्वर
- नदी: दक्षिण-पूर्णा
- जिल्हा: हिंगोली

17. धरण: येलदरी
- नदी: दक्षिण-पूर्णा
- जिल्हा: परभणी

18. धरण: डिंभे
- नदी: घोडनदी
- जिल्हा: आंबेगाव (पुणे)

19. धरण: भुशी, वळवण
- नदी: इंद्रायणी
- जिल्हा: लोणावळा (पुणे)

20. धरण: निळवंडे (अप्पर प्रवरा)
- नदी: प्रवरा
- जिल्हा: अकोले (नगर)

21. धरण: पानशेत (तानाजीसागर)
- नदी: अंबी (मुठा)
- जिल्हा: पुणे

22. धरण: खडकवासला
- नदी: मुठा
- जिल्हा: पुणे

23. धरण: चाणकपूर
- नदी: गिरणा
- जिल्हा: नाशिक

24. धरण: मुळशी
- नदी: मुळा
- जिल्हा: पुणे

25. धरण: तोतलाडोह, कामठीखैरी
- नदी: पेंच
- जिल्हा: नागपूर

26. धरण: पुरमेपाडा
- नदी: बोरी
- जिल्हा: धुळे

27. धरण: भातसा (शहापूर)
- नदी: भातसा
- जिल्हा: ठाणे

28. धरण: उजनी
- नदी: भीमा
- जिल्हा: सोलापूर

🛑 इस्रो ( ISRO ) ने अंतराळात उगवली चवळी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) अंतराळात आणखी एक इतिहास रचला आहे.

ISRO ने अंतराळात चवळीचे बियाणे उगवले होते. त्यातून आता पाने फुटली आहेत.

' PSLV-C60 POEM-4 प्लॅटफॉर्म'वर अंतराळात पाठविण्यात आलेल्या चवळीच्या बियाण्यांमध्ये पाने फुटल्याची माहिती ISRO ने दिली आहे.

या बिया 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्हीसी 60 रॉकेट द्वारे स्पीड एक्स सह पाठवण्यात आल्या होत्या

अगदी चार दिवसात या चवळीच्या बियांना अंकुर फुटले आहे.

इस्रोने SpaDex मिशन अंतर्गत 229 टन वजनाच्या PSLV रॉकेटसह दोन छोटे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत

हे उपग्रह 470 किलोमीटर उंचीवर डॉकिंग आणि अनडॉकिंग करतील

इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते या मोहिमेच्या यशामुळे भारताचे आगामी चांद्रयान - 4 स्वतःचे अंतराळ स्थानक स्वतःचे अंतराळ स्थानक आणि भारतीय प्रवाशांचे पाऊल ठेवण्याची स्वप्न पूर्ण होतील.

पंधरा हजार शिक्षक भरतीला 20 जानेवारीपासून सुरूवात.

पवित्र पोर्टल कंपनीला 69 लाख रुपये मंजूर; जि.प.शाळांमध्येही सेमी इंग्लिश.

पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त..🔥

महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश.

♦️भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती..

👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जानेवारी 2025[मुदतवाढ]

👉 पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025

👉 Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/
अधिकृत वेबसाईट :-
https://sbi.co.in

✈️ @MPSC_vision

🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत

🏠 सदाशिवपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कसबापेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞

📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा