Life With Positive Vibes

@lifewithpositivevibes


"If you can't find the right path, you have to make it your own," while making it there will be ups and downs, in such a situation the only option is to focus your goal and keep walking to achieve it and in this journey I am always with you...

Life With Positive Vibes

23 Oct, 09:04


इतरांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या, निष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाने लोकांच्या दूषणांची पर्वा केली नाही. ‘मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा, भोगी म्हणूनी उपहासा, मी योगी कर्माचा, माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा” असे म्हणत श्रीकृष्णाने सोळा सहस्त्र कन्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला. “पराधीन ना समर्थ मी घेण्या वार कलांकाचा” असे धोरण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या अवतारकार्यात अन्याय करणाऱ्यांना शासन करत गांजलेल्या दुःखी जीवांना दुःखातून मुक्ती दिली. त्यामुळे इतर काय म्हणतील याचा विचार न करता जे घडून गेले ते चांगलेच घडले, जे घडतेय ते चांगल्यासाठीच घडतेय आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहणे हा जीवनाचा उद्देश असायला हवा.....🚩

Good Afternoon Officers

Life With Positive Vibes

22 Oct, 01:57


"🎯एकाग्रता आणि अभ्यास📚"

Good Morning Officers....👍✌️

Life With Positive Vibes

21 Oct, 02:22


पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाली आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला  बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿

Good Morning Officers......🔥🔥

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

20 Oct, 13:17


फक्त वाचू नका,विचार करा घडलं त्याचा.

गरीबी खूप वाईट असते हो😔जे लोक तसे दिवस काढून अभ्यास करतात त्यांना विचारा साहेब😢पोट मारून,बेचव जेवण खाऊन😭 कितीतरी वर्ष हडाचं पाणी करून😭तोंडावर परीक्षा आली असताना त्यांच्या अभ्यासाची जळून अशी राख होते?ह्याला कोण जबाबदार काय पाप असेल ह्या निस्वार्थी मुलांचं ज्यांच भविष्य ह्या आगीत जळाले😭
ही वणव्यासारखी आग जंगलात लागते हे एकूण आहे परंतु पुण्यासारख्या शहरात लागते हे आश्चर्यजनक😔आग लागली का?लावली गेली ह्याचा तपास करणे गरजेचे.गरीब विद्यार्थ्यांचे पुस्तके,महत्त्वाची परीक्षेस लागणारी कागदपत्रे ह्यांची जळून राख झाली.ह्यात हाल होतात गरिबांच्या लेकरांचे,श्रीमंत नवीन पुस्तके घेवू शकतात पण गरिबांचे काय?😔सढळ हाताने मदत करणाऱ्या संस्था,व्यक्ती,प्रशासान अश्या विद्यार्थ्यांना लवकर मदत करेल का?खरचं येईल का कुणाला ह्या विद्यार्थ्यांची दया आणि कोण देईल ह्यांना आधार?
ठिकाण-ध्रुवतारा अभ्यासिका.नवी पेठ,पुणे.
...........🦋🌺🙏............
शब्दांकन-B.S.Kendre

Life With Positive Vibes

19 Oct, 11:42


#भरोसा... #

Jay Shree Krishna.....🙏🙏
Good Evening Friendes....😊😊

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

19 Oct, 00:29


ज्यांनी स्वतः ला घडवण्यासाठी वेळ गमवलेला असतो त्यांना घमंड नाही तर आत्मविश्वास असतो की ते काम तर करू शकतील...अभ्यास आणि मेहनत कधीच वाया जात नाही .काही चुका होतात त्या शोधाव्या लागतात चुका का  झाल्यात याच चिंतन करावं लागत...आणि तीच चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते... नशिबाच माहिती नाही पण मेहनत वाया जात नाही.... Pradip Patil Malekari

Good Morning Officers.....🔥🔥

Life With Positive Vibes

18 Oct, 16:13


बाबा 🥰

आईवडील या आपल्या आयुष्यातील अशा दोन व्यक्ती आहेत, ज्यांचा आधार मुलांना ती लहान असो वा मोठी कायमच लागतो. आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार असेल तर मुलं जगातील कोणत्याही कठीण आव्हानाला तोंड देऊ शकतात. मुलांना जन्म देण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आईवडील आयुष्यभर काबाडकष्ट करतात.💯😇 पण त्या कष्टाची झळ कधीच मुलांपर्यंत पोहचू देत नाहीत. मुलांना मात्र नेहमीच आईवडील गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते. नंतर त्यांची आठवण काढून काहीच उपयोग नसतो. म्हणूनच आईवडील जिवंत असताना त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर भरभरून प्रेम करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही.जितकं आईवरचं प्रेम शब्दांतून , कृतीतून व्यक्त केलं जातं तितकंच बाबांविषयीचं प्रेम आपण करायला हवं तितकं व्यक्त करत नाही.😔
भलेही आपल्या मनात त्यांच्याविषयी कितीही आदर आणि प्रेम असो, आपण ते शब्दांतून ,स्पर्शातून व्यक्त करत नाही. त्यांच्या धाकापोटी आपण त्यांच्यात आणि आपल्यात उगाच एक अदृश्य भिंत बांधून ठेवलेली असते. ती भिंत तोडून टाका आणि बाबांवरचं प्रेम बिनधास्त व्यक्त करा. बाबांचा वाढदिवस, फादर्स डे या खास दिवशी बाबांवरचं प्रेम तर व्यक्त करायलाच पाहिजे पण खरं तर आपल्या माणसांवरचे प्रेम व्यक्त करायला कुठल्या खास दिवसाची गरज नसते.💯
ते आपण कधीही व्यक्त करू शकतो. तुम्हालाही तुमच्या वडिलांविषयीचा प्रेम, आदर आणि काळजी व्यक्त करायची असेल पण त्यासाठी शब्द सापडत नसतील तर आम्ही तुमच्या मनातल्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. बाबा, तुम्ही मला केवळ कसं जगायचं हेच शिकवलं नाही, तर तुमच्याकडे बघून आयुष्य कसं असावं याची शिकवण मिळते. बाबा तुम्ही माझा आदर्श आहात...!
तुमचा प्रेमळ हात डोक्यावर आहे म्हणून हे आयुष्य सुंदर आहे. ते लोक भाग्यवान असतात ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. बाबा तुमची साथ असेल तर तुम्ही माझ्यासाठी बघितलेली स्वप्ने मी पूर्ण करू शकेन.🤩💯💫

बाबा, तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्या गेल्याचा मला अभिमान आहे. इतर कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार. 🤗

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे , कितीही मोठे झालो तरी पाठीशी ठामपणे बाबांनी उभं असणं होय. तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. बाबा, तुम्ही मला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी भेट आहात. तुमच्याशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नसेल.

माझे बाबा हे माझे हिरो, माझा आधार, माझा हक्काचा श्रोता, माझे मार्गदर्शक, मित्र, संरक्षक आणि प्रत्येक वेळी मला गरज असताना माझा सपोर्ट आहेत. बाबा, तुम्ही ग्रेट आहात...!

या जगात कोणीही मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही.💯

या नात्यात काहीतरी खास आहे, ज्यामुळे जगातील प्रत्येक वडील आणि प्रत्येक मुलगी याबद्दल भरभरून बोलते. हा अनुभव घेण्यासाठी एकतर तुम्हाला मुलगी व्हावे लागेल किंवा मुलीचा बाबा! या नात्याचे शब्दांत वर्णन केले जाऊ शकत नाही...

I miss you papa😔

जर तुम्हाला हे Success thoughts in Motivation आवडले तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.👍🏻...

आपलीच सोबती:-
✍🏻Mannu(A.S.J)

Life With Positive Vibes

18 Oct, 03:54


💯गरीबीच्या आयुष्यात खेळणी महाग असतात, स्वप्न नाही......🤩✌️

G●●d M۝řNΐNg

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

17 Oct, 13:58


जीवन एक सुखकर प्रवास आहे त्यात कधी दुःखाचे घाट तर कधी सुखांची वाट थोड्या थोड्या अंतराने येत राहतं फक्त या रस्त्यात आपल्या संयम सुटुद्यायचा नसते लोकं काय नावं ठेवणारच आपण आपलं ध्येय उत्तम प्रकारे साध्य करायचं असतं!,,,✍🏻

एकमन#लेखक
 
@Ommshelke

Good Evening Friendes......👍🔥

Life With Positive Vibes

17 Oct, 01:39


🍀🍁गेलेल्या क्षणासाठी झुरत
       बसण्यापेक्षा समोर असलेले
         आयुष्य भरभरून जगा..🍂🌿

#Good_Morning  ☺️😍😊

Life With Positive Vibes

16 Oct, 07:50


🔥 राहुलच्या संघर्षाची कहाणी 🔥

https://youtu.be/aVnINa7Zj_8
https://youtu.be/aVnINa7Zj_8
https://youtu.be/aVnINa7Zj_8

👉 अडीच वर्षांचे कष्ट व IDBI JAM म्हणुन 2 वेळा Final Selection

नक्की पहा व जास्तीत जास्त Share करा ..

Life With Positive Vibes

16 Oct, 01:02


सोन आणि आयुष्य...
घासल्याशिवाय चमकत नाही....🏆

Good Morning Officers....😊👍💐

Life With Positive Vibes

15 Oct, 02:45


दुसऱ्या पेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका.

कारण...

घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला नेहमी वेळच लागतो... !!

आयुष्यात नेहमी सकारात्मक रहा मित्रांनो होईल होईल नक्की होईल आणि जे होईल ते एकदम बेस्ट होइल...💯

Good Morning Officers.....👍✌️🔥💐

https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

14 Oct, 16:03


🏆👑 """Focus On Your Goals"""🎯📚📚✌️

Good Night Friendes....😊😊

Life With Positive Vibes

14 Oct, 04:11


"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते. त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.

तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो. आणी म्हणतो अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील. तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला."

⭐️ तात्पर्य :-

कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
एका दिवसात यश प्राप्त होत नाही. ✌️✌️

Life With Positive Vibes

13 Oct, 03:53


काही गोष्टी,व्हिडिओ एवढ्या काळजाला लागून जातात😔की त्यांच्यापासून नवीन जीवन जगण्याची उमेद निर्माण होते.आपले जीवन जसे आहे ते सुद्धा जगणे इतरांचे स्वप्न असू शकते😥कधीतरी गरजूंना मदत करा,दुखितांना आधार द्या,माणसाला त्याची खरी परिस्तिथी पाहून माणूस म्हणून स्वीकारा नक्की सुखाची झोप लागेल.आपण फक्त आपल्या कुटुंबाचा,स्वतःचा भल होण्याचा विचार करतो😔आणि त्या स्वार्थापोटी इतरांच्या दुःखाचा विचार करत नाही.समोरच्या व्यक्तीचे दुःख,यातना तोपर्यंत कळत नाहीत जोपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहत नाही.कपड्यावर दहा ठिकाणी ठिगळे असणाऱ्या गरीब शेतकऱ्याचा भाजीपाल्याचा आपण भाव करतो हे किती योग्य?कधीतरी रस्ताने जात असताना कोणी मदत मागितली तर नक्की करा,शिल्लक असलेले अन्न गरिबांना दान करा,अर्धजुने कपडे,पुस्तके,चपल्ले गरिबांच्या मुलांना,गरजूंना🙏🏻नक्की द्या.त्यांना शिक्षणात मदत करा. त्यांचा चेहऱ्यावर जो आनंद येईल त्याचाएवढा तुमच्या आयुष्यात सुखाचा क्षण नसेल.तुमचा वाढदिवसाला होणारा खर्च टाळून तो वृध्दाश्रम,अनाथगृहामध्ये जाऊन त्याच पैशाचे त्यांना सामान घेवून द्या,नक्कीच तुमचे जीवन सार्थ होईल🙏🏻चांगले कर्म करताना तुमच्या चारित्र्यावर पण शंका घेतली जाईल,तुम्ही करत असलेल्या कामावर लोकं हसतील,चेष्टा करतील,तुमच्यावर जळतीलही पण त्याचा विचार न करता इतरांचे आयुष्य नक्की फुलवावे.आपण स्वतः काही चांगला काम करत नसलो तर निदान जे करत आहेत त्यांचा मार्ग तर आडवू नका🙏🏻
समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेवून त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागणे हे सुद्धा काही देवपुजेपेक्षा कमी नाही.
ईश्वर कुणालाही भुके,दुःखी न ठेवो हीच सदिच्छा🙏🏻माझे दोन शब्द वाचल्याबद्दल धन्यवाद🙏🏻
............🦋🌺🙏............


https://t.me/lifewithpositivevibes

Life With Positive Vibes

12 Oct, 01:46


""पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
    तुमच्या कर्तुत्वाला,
  पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत नव्या शुभेच्छा."

  विजयादशमी/ दसऱ्याच्या                    
हार्दिक शुभेच्छा....🍃😊🙏

 Good Morning Officers......👍✌️💐❤️

Life With Positive Vibes

11 Oct, 13:09


सर्वांनाच आग्रहाचे निमंत्रण


📌स्थळ:- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

📌वेळ:- सकाळी 7.30 वा.

📌टीप:-
प्रवेश सर्वांसाठी खुला (Saarthi + Non Saarthi)