Aspirants_Future Officers

@aspirantsfutureofficers


महाराष्ट्रातील विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सरळसेवा भरती संदर्भात जाहिराती, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स, भरती प्रक्रिया विषय माहिती इत्यादी एकाच मंचावर

Aspirants_Future Officers

22 Oct, 03:55


💥💥मृद व जलसंधारण विभाग जाहीर सूचना.

अनुपस्थित उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी तपासणी बाबत...

कागदपत्र पडताळणी दिनांक:- 25-10-2024

Aspirants_Future Officers

20 Oct, 06:08


#RTI
AMVI 68 पदे रिक्त आहेत.. 🙏

Aspirants_Future Officers

19 Oct, 16:42


मन ओढाय ओढाय

अभ्यास करताना मन प्रसन्न हवे त्यामुळे नकारात्मकतेला महत्व देेऊ नये….मला हे जमेल का? निट होईल का? मला जमणारच नाही… हे असले विचार येऊच देऊ नये….. यांना अजिबात महत्त्व देऊ नये…….

अभ्यास करताना अडचणी येतात त्यासाठी स्वत:च्या स्वाभिमानाला महत्व दिले जाऊ नये… आपल्या मित्राला किंवा त्या विषयातील जाणकाराला विचारावे…

अभ्यास करताना फुकटचा आत्मविश्वास बाळगु नये…. मलाच सगळे येते, मीच हुशार… या नसत्या भ्रमाला महत्व देऊ नये….. आत्मविश्वास असावा पण अतिआत्मविशास घातकच आहे….

अभ्यासात गर्वाला महत्व असु नये…….. गर्वाचे घर नेहमी खाली असते हे आपण सर्वसुश्रुत आहोत……. त्यामुळे हुशारीचा गर्व करु नये…….

अभ्यासात online अभ्यासाला "जास्त" महत्व देऊ नये….. इथे "जास्त" हा शब्द महत्त्वाचा……. Online अभ्यास करावा पण त्याच्या आहारी जाऊ नये……

माझा अभ्यास य़ाच जागी होतो, त्याच जागी होतो, अशाच परिस्थितीत होतो तशाच होतो असल्या गोष्टींना महत्व देऊ नये… असे मी का म्हणतेय जरा लक्ष द्या……. आत्ता च्या परिस्थितीत तुम्हाला जर वाचनालयात जाऊनच अभ्यास करायची सवय असेल तर आता ते शक्य आहे का हा प्रश्न स्वत:लाच विचारा त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत मनाची तयारी असलीच पाहिजे……

काही लोकांचे सल्ले ऐकावे पण त्यांना अवास्तव महत्तव देऊ नये…….ऐकावे जनाचे करावे मनाचे या तत्त्वाचे पालन करावे 

Join
@aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

19 Oct, 12:22


आपणांस माहित आहे का?....

♦️1 मे : महाराष्ट्र दिन
♦️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन'
♦️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’

♦️1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस
♦️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर)
♦️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा

Aspirants_Future Officers

19 Oct, 11:57


♦️ What is Mastic Asphalt ♦️

👉 Mastic asphalt is a type of asphalt that is used in construction for waterproofing and surfacing.

👉It is a mixture of asphalt, limestone or granite dust, and a bituminous binder.

👉 The mixture is heated to a high temperature and then applied to a surface in layers, forming a dense and durable coating.

👉 Mastic asphalt is commonly used for roofing, flooring, and paving applications.

👉 It is known for its excellent waterproofing properties, resistance to weathering and wear, and long-lasting durability.

#Highway

Aspirants_Future Officers

18 Oct, 17:02


अभ्यासाची रेणूसूत्रे

1. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोषआहे हे ओळखून, योग्य व्यायाम, आहार व वैद्यकिय उपचार यांनी तो दूर करावा. च्यवनप्राश, ब्राह्मी सारखी औषधे, दूधासारखा पौष्टिक आहार यांचाही उपयोग होउ शकतो.

2. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रध्देच्या जोरावरच शिवरायांच्या मावळ्यांनी शून्यातून स्वराज्य उभारले. औरंगजेबाची अफाट सामर्थ्यशाली सेना युद्ध हारली ती देखील श्रध्देच्या अभावामुळेच. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञानसंपादनाची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. आपल्या अंतस्थ शक्तीबाबत आपण साशंक राहू नये. जीवनात अपयशी ठरणारी माणसे अपयशी ठरतात ती स्वत:ची शक्ती न ओळखल्यामुळेच. "काळजीपूर्वक अभ्यास करुन मी माझ्या ज्ञानाचा विकास करुन घेईनच" अशानिर्धाराने अभ्यासाला लागलात तर अशक्य काहीच नाही.

3. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. अर्थात तुम्ही जर तुमच्या अभ्यासविषयांवर प्रेम कराल तर एकाग्रतेने अभ्यास करणे तुम्हाला सहज जमेल. परिचय, सहवासानेच प्रेम वाढते. म्हणून अभ्यासाचे विषय तुम्हाला लगेच आवडू लागतील असे नव्हे. पण अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल. श्रध्दा आणि प्रेम यांद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ताणर‍हित व संघर्षरहित असते.

Join
@aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

17 Oct, 17:15


कावळ हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो, तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्यावर चावा घेतो, परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही, कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवित नाही. फक्त त्याचे तो पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरवात करतो, खरं तर उड्डाण जितके जास्त होते, तितके श्वास घेणे कठीण जाते आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे कावळा आपोआप कोसळतो ....
आपला वेळ कावळ्याबरोबर वाया घालवणे थांबवा, फक्त स्वत: उंच उंच जात रहा, सतत सतत काम करत रहा, कुमकुवत असेच संपतील !! एक सत्य

Join
@aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

16 Oct, 16:11


काळीज तुटंत ही अगतिकता बघुन, पण तुम्ही खचून जाऊ नका.


शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची. ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते.फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात.आता तर इंजीनियरिंग वाली पोरं पण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात.
ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात.
त्यांच्यापेक्षा जास्त हाल इंजीनियरिंग झालेल्या पोरांचे होतात. बापानी घरी पार ओढताण करुन,तेवढी कमाई पण नसताना लाखो खर्च करुन पोराची इंजीनियरिंग पूर्ण केलेली असते आणि हे कंपनीवाले बाजारात शेळ्या विकल्याप्रमाणे आठ-दहा हजार द्यायलापण नाक मुरडतात.

ह्या वयात जेवढि मनाची घालमेल होत असेलना तेवढी कधीच होत नाय.
शिक्षण पूर्ण करून नोकरी नाय. घरी बापाला पैशे सुद्धा मागायची लाज वाटते. हे कमी म्हणून गावातले अडानी त्याला विचारणार,"व्हंय रं अजुन किती राह्यलेय तुझं शिक्षण?
तुला नोकरी कधी लागणार ?
आयला तू तर साहेब व्हणार ब्वा."
किती डोकं फिरत असेल अशे टोमणे मारल्यावर?आणि त्याच्यातुन जर दुष्काळ पडला तर विचारुच नका.
दहावी-बारावी मधील काठावर पास झालेला एखादा आर्मीत भरती झालेला मित्र सुट्टीला आल्यावर त्याला ही पोरं म्हणतात,"मजा आहे ब्वा तुमची" .
काळीज तुटंत ही अगतिकता बघुन.
शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली पोरं काय करणार ?
कुठंच काय नाय जमलं तर मोबाइल शॉपी काढ, कसले पॉलिसी एजेंट हो, MIDCमध्ये कामाला जा, एखांद्याच्या हाताखाली कामाला जा किंवा तसलेच काही सटर फटर उद्योग करावे लागत्यात ह्या सुशिक्षित पोरांना.
' आई जेवु घालीना आणि बाप भिक मागु देईना' पार अशी अवस्था होते त्यांची.
मला वाटते मानसिक पाठबळाची सगळ्यात जास्त गरज ह्याच वयात असते.
त्यांना पालकांनी नक्कीच समजुन घेतले पाहिजे. सगळं काही ठीक होईल असा विश्वास त्यांना दिला पाहिजे.
बाकी पोरांनीपण सरकारला, मंदीला,
दुष्काळाला शिव्या देण्यापेक्षा ह्यातून कसा उपाय निघेल हे बघितले पाहिजे.
"एक ध्यानात ठेवा सगळं ठीक होईल पण फक्त तुम्ही खचुन जावु नका ".


🔥Join
@aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

15 Oct, 17:12


📣 **अभ्यास करताना वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दलचे काही ठोकताळे (Thumb Rules) :*
*
🔰 *1. 55-5 Rule*
55 मिनिटे तन्मयतेने अभ्यास केल्यानंतर जागच्या जागी 5 मिनिटे रिलॅक्स व्हा.
काय अभ्यास केला याचा आढावा घ्या.
अभ्यासात एकाग्रता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी या चक्राची पुनरावृत्ती करा.
शरीराच्या Ultradian rhythms प्रमाणे हे चक्र नैसर्गिकरीत्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरते.

🔰 *2. 33-33-33 Rule*
अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी पोटात 33% अन्न, 33% पाणी आणि 33% हवा असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वाचलेले लक्षात राहण्यासाठी दिवसभरात 33% वाचन, 33% लिखाण (सराव) आणि 33% मनन (आठवून पाहणे) गरजेचे असते.
अभ्यासाच्या कुठल्या टप्प्यावर आहात त्यानुसार या प्रमाणात बदल होईल. मात्र परीक्षा जवळ येईल तसे सराव आणि मनन यांचे प्रमाण वाढत जायला हवे.

🔰 *3. 2 Minutes Rule*
जे काम 2 मिनिटात होऊ शकते ते लगेच करून टाका. अशी छोटी छोटी कामे त्या त्या वेळी केली नाहीत तर साठून राहतात आणि नंतर महत्वाच्या कामाच्या आड येतात.

🔰 *4. 20-20-20 Rule*
अभ्यास करताना प्रत्येक 20 मिनिटांनी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे किमान 20 सेकंद पहा. खूप वेळ पुस्तक किंवा Tab वगैरे वरती लक्ष केंद्रित केल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण यामुळे कमी होईल आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल.

🔰 *5. 2 Hours Time Blocking*
महत्त्वाचा विषय किंवा टॉपिक यासाठी दिवसातील 2 तास राखून ठेवा. या वेळेत maximum intensity आणि minimum distractions असायला हवे.

🔰 *6. 80/20 Rule (Pareto Principle)*
तुमच्या दैनंदिन कृतीमधील फक्त 20% कृती अशा असतात ज्यांचे तुमच्या यशात 80% योगदान असते. अशा उच्च परिणामकारक कृती ओळखून त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा.

🔰 *7. 10/10/10 Rule*
तुम्ही घेत असलेले निर्णयांच्या पुढील 10 मिनिटे, 10 महिने आणि 10 वर्षातील परिणामांचा विचार करा. कधी कधी दूरच्या फायद्यासाठी जवळचे नुकसान पत्करणे व्यवहार्य असते. ही दूरदृष्टी ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्या.

🔰 *8. 4 D's*
अभ्यासाव्यतिरिक्त ज्या अनुत्पादक गोष्टीत आपला वेळ जातो त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठीची तत्वे -
🎯• Do it (2 मिनिटाहून कमी वेळ लागणारी गोष्ट लगेच करून टाका)
🎯• Defer it (कमी महत्त्वाची आणि तातडीने करण्याची गरज नसलेली बाब पुढे ढकला)
🎯• Delegate it (तुम्ही स्वतः करण्याची गरज नसलेली गोष्ट दुसऱ्याकडून करून घ्या)
🎯• Delete it (गरज नसलेली गोष्ट बाजूला सारा)

⚜️Remember, time management is not about managing TIME,
it's about managing PRIORITIES.

Join - @aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

15 Oct, 04:14


BMC SE Syllabus.

Join @aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

15 Oct, 03:32


🎯आज दुपारी निवडणूक आचरसंहिता लागू होणार🎯

Join @aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

15 Oct, 01:44


BMC-2024 🔥

१) SE (Civil) -233 ❤️
२) JE (Civil) -250 ❤️
४) SE(Mech/Elec) -77
४) JE(Mech/Elec) -130

Form filling dates ~ 11/11/2024 to 2/12/2024


🎯 Join @aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

14 Oct, 16:55


मराठी व्याकरण

अलंकार

भाषेच्या अलंकाराचे खालील प्रकार पडतात

♦️शब्दालंकार
यात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते.

अनुप्रास कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा. अ) आज गोकुळात रंग खेळतो हरी l राधिके जर जपून जा तुझ्या घरी l ब)बालिश बहु बायकात बडबडला. क)गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपळ चरण अनिलगण निघाले.

यमकवेगवेगळे अर्थ असणाऱ्या, परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात.

अ)मन सज्जना भक्तीपंथेची जावे l

तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे l

ब)सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो l
कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो l

श्लेष
या अलंकारात एकाच शब्द दोन अर्थाने वापरला जातो.

अ)मला एस.टी. लागते. (गरज असणे/त्रास होणे)
ब)कुस्करू नका ही सुमने ll
जरी वास नसे तिळ यास,
तरी तुम्हास अर्पिले सु-मने ll

क)शंकरास पुजिले सुमने.

ड)श्रीकृष्ण नवरा मी नवरी l
शिशुपाल नवरा मी न-वरी l

इ)हे मेघ, तू सर्वांना जीवन देतोस.(आयुष्य /पाणी)

अर्थालंकार

उपमा दोन वस्तू मधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परिस सारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो.

अ)सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी.
ब)असेल तेथे वाहत सुंदर दुधारखी नदी.
क)मुंबई ची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी.

♦️उत्प्रेक्षा
उपमेय हे जणू उपमानच आहे हे दर्शवण्यासाठी जणू, जणुकाय,गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो.

अ)हा आंबा जणू साखरच!
ब)त्याचे अक्षर जणू काय मोतीच!
क)ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू!
ड)आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण!

♦️अपन्हुती
याचा अर्थ लपविणे असा होतो.यात उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते.

अ)हा आंबा नाही, ही साखरच आहे.(उपमेय-मूळ वस्तू, उपमान-उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू.)
ब)हे हृदय नसे, परी स्थंडिल धगधगते l
क)ओठ कशाचे? देठची फुलले पारिजातकाचे l

♦️अनन्वय
ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे.

अ)आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी l
ब)झाले बहु, होतील बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा l

♦️रूपक
जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.

अ)देह देवाचे मंदिल l आत आत्मा परमेश्वर
ब)वाघिणीचे दूध प्याला,वाघ बच्चे फाकडे ll 

♦️अतिशयोक्ती
एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती असे म्हणतात.

अ)जो अंबरी उफळता खुर लागलाहे 
तो चंद्रमा निज तनुवरि डाग लाहे.
ब)ती रडली समुद्राच्या समुद्र.

क)तुझे पाय असे भासतात, जणू हवेवर नाचतात.
ड)दमडीचं तेल आणलं, सासुबीचं न्हाणं झालं
मामांजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.

♦️दृष्टांत :
एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.

अ) लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l
ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार l
ब)निवडी वेगळे क्षीर आणि पाणी l राजहंस दोन्ही वेगळाली l
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे l येरागबाळाचे काम नव्हे l
क)न कळता पद अग्नीवर पडे l न करी दाह असे न कधी घडे l
अजित नाम वदो भलत्या मिसे l सकळ पातक भस्म करितसे ll

♦️विरोधाभास :
वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.

अ) जरी आंधळी मी तुला पाहते.
ब) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे.

🎯Join
@aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

13 Oct, 15:51


📢 PYQ analysis करणे का आवश्यक
आहे? ✔️✔️


🔵आपणाला एखाद्या टेकडीवर चढाई करून शिखर गाठायच आहे पण वाटाड्या नसेल तर आपण रस्ता चुकू शकतो, सोपे रस्ते आपल्याला माहित नसतील. स्पर्धा परीक्षेत सुद्धा आपण PYQ analysis करत नसू तर आपण सोपा रस्ता भरकटून उगाच कष्ट करत बसतो. परीक्षेचा अभ्यास करताना PYQ हे आपले सर्वात उत्तम मार्गदर्शक असतात.


🔵PYQ analysis केल्याने एखाद्या मुद्द्याला परीक्षेत किती महत्त्व दिले जाते. त्या मुद्यावर कोणत्या angal ने प्रश्न विचारले जातात. एखाद्या मुद्द्याचा किती सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे अभ्यास करताना आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे समजते.
🔵अशी कल्पना करा की तुम्हाला आयोगाची प्रश्नपत्रिका तयार करायची आहे तर तुम्ही काय कराल? सर्वात प्रथम syllabus समोर ठेवाल व आधी प्रश्नपत्रिका कशा तयार केल्या आहेत त्या संदर्भ म्हणून घ्याल. Paper setter पण हेच करतात. यावरून तुम्हाला PYQ चे महत्व समजले असेल.


🔵अभ्यास करताना PYQ sandwich पद्धत वापरावी म्हणजे आपण कोणत्याही टॉपिक चा अभ्यास करणार असू तर सुरवातीला त्या टॉपिक वर आलेले PYQ पाहणे आवश्यक आहे. म्हणजे
टॉपिक वाचताना काय लक्षात ठेवण्याची गरज आहे हे समजते. व टॉपिक वाचून झाल्यावर परत PYQ पाहिल्यास आपला आयोगाच्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास झाला आहे का हे समजते


🔵PYQ साठी topic wise PYQ analysis केलेली पुस्तके मार्केट मध्ये भेटतात उदा. लॉजिक बूस्टर. ती वाचताना main focus प्रश्नावर ठेवावा व EXPLAINATION कमीत कमी व आवश्यक तेवढेच वाचावे. म्हणजे PYQ वरून आपण भरकटत नाही.


🔵एका प्रामाणिक परिक्षार्थीचे अपयशी होण्याचे कारण बहुदा PYQ कडे दुर्लक्ष करून फक्त दिवस रात्र वाचत बसणे हेच असते. तरी यशस्वी होण्यासाठी ह्या छोट्या पण खूप महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.


#अभ्यास


🎯 Join -
@aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

13 Oct, 04:17


♦️👉अकोला महानगरपालिका मंजूर व
रिक्त पदे.


🎯 Join - @aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

13 Oct, 03:47


#IMP
#MPSC

🎯 Join -
@aspirantsfutureofficers

Aspirants_Future Officers

13 Oct, 03:42


◾️ जल अभियंता खात्यात 400 पदे रिक्त.
Join - @aspirantsfutureofficers