जॉब आहे का, vacancy आहे का असे अनेक मेसेजेस मला दररोज येत असतात. यातील काही लोक खरोखरच चांगली असतात आणि काहींना अजून शिकण्याची इच्छा असते आणि संधीही हवी असते. मीही माझ्या परीने या लोकांना संधी कशी मिळेल किंवा माझ्याकडे काही काम देता येईल का हे बघत असतो.
मात्र, या approach करणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे 90-95% लोकं अशी असतात की त्यांना त्यांच्याच गावात जॉब हवा असतो. खासकरून महाराष्ट्रात हे अगदीच कॉमन आहे. काम करण्यासाठी दुसऱ्या गावी/शहरात जायची त्यांची तयारी नसते. त्यांचा प्रश्नच असा सुरू होतो की - सर xyz लोकेशन साठी vacancy आहे का? सुरुवातीला मी विचारायचो की तुला तिकडेच जॉब का हवा आहे, तर त्यावर एक ठरलेलं उत्तर असायचं की सर घरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर वडिलांची/आईची तब्येत बरी नसते. आपलं गाव सोडून जायचं नाही म्हणून ही सगळी कारणं पुढे केली जातात. त्यात तथ्य असं काही नसतंच. त्यात तर आज एका मुलाने कहरच केला. म्हणे तुमच्याकडे वर्क फ्रॉम होम आहे का? (शाब्दिक) चप्पल काढून त्याला चोपणारच होतो पण आवरतं घेतलं आणि हा लेख लिहायला बसलो.
मार्केटमध्ये नवीनच जॉब बघणाऱ्या मुलांना/मुलींना माझं एकच सांगणं आहे की विशिष्ट लोकेशनलाच जॉब हवा हा हट्ट सोडा. निदान सुरुवातीची काही वर्षे तरी दुसऱ्या गावांना/शहरांमध्ये जाऊन जॉब करा. नवीन लोकांना भेटा. त्यातून खूप काही बघायला आणि शिकायला मिळेल जे तुमच्या गावात आयुष्यभर मिळणार नाही. इथून पुढे मला कुणी जॉब बद्दल मेसेज करणार असेल तर पहिल्याच वाक्यात लोकेशन बद्दल कृपया बोलू नका, नाहीतर व्यवस्थित समजावून सांगितलं जाईल.
This message is very important for the freshers. Recent trends of social media have changed communication language. But, professional career requires eagerness to learn and dedication towards organisation than that of the private interests. It is need of the hour to change tone, language and demands. Be polite and impressive.